91 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' गात केला डान्स! गायकापासून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

Asha Bhosle Tauba Tauba : आशा भोसले यांनी त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये विकी कौशलचं 'तौबा तौबा' हे गाणं गायलं आणि त्याशिवाय त्यावर त्यांनी डान्सही केला आहे.

दिक्षा पाटील | Updated: Dec 30, 2024, 12:35 PM IST
91 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' गात केला डान्स! गायकापासून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव title=
(Photo Credit : Social Media)

Asha Bhosle Tauba Tauba : लोकप्रिय दिग्ग्ज गायिका आशा भोसले यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री तृप्ती डिमरीचं 'तौबा तौबा' गाण गायलं. आशा भोसले यांच्या आवाजात ते गाणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद आणि आश्चर्य झालं. व्हायरल झालेल्या या गाण्याला जेव्हा आशा भोसले यांच्या आवाजाची साथ मिळाली तेव्हा सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर त्यावर प्रेक्षकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात या गाण्याचा गायक करण औजलानं देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत त्याला बेस्ट मोमेंट म्हटलं आहे. 

कडक एफएम यापेजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत करण औजलाला 'तौबा तौबा' गाणं गाताना दिसत आहे. खरंतर आशा भोसले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये हे गाणं गायलं आहे. तर त्यासोबत त्या गाण्याची हूक स्टेप देखील केली आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या या परफॉर्मेंसनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर प्रेक्षक त्यांना चीयर करताना दिसत आहे. करण औजलानं या व्हिडीओवर त्याची प्रतिक्रिया दिली आणि हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यानं म्हटलं की 'संगीताच्या देवी आशा भोसलेनं यांनी नुकतच तौबा तौबा गाणं गायलं... एका छोट्याश्या गावातून आलेल्या मुलानं लिहिलेलं गाणं, ज्याचं काही म्युजिकल बॅकग्राऊंड नाही आहे आणि इन्स्ट्रूमेंटचं काही ज्ञान नाही, अशा व्यक्तीचं गाणं त्यांनी गायलं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

याविषयी पुढे सांगत करण म्हणाला, 'या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आणि फक्त प्रेक्षकांकडून नाही तर म्युजिक आर्टिस्टकडून देखील. असं सगळं असलं तरी सुद्धा हा क्षण मी विसरू शकणार नाही. मी खरोखर धन्य आणि कृतज्ञ आहे. त्यामुळे आता मिळालेल्या या प्रेमानंतर पुन्हा एकदा मला अशा प्रकारची गाणी आणि लय बनवण्यासाठी उत्साही केलीय. तर करण या गाण्याविषयी म्हणाला, हे गाणं मी वयाच्या 27 व्या वर्षी लिहिलं होतं. हे गाणं माझ्या पेक्षा चांगलं आशाजी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी गायलं.'

या सगळ्यावर नील नितिन मुकेशनं लिहिलं की लेजेंड असण्याचं कारण. ताईंवर देवाचा आशीर्वाद असाच राहू देत. संगीतकार पलाश मुच्छलनं एक हार्ट शेप आणि हाय फाइव्ह इमोजी कमेंट केलं आहे. एली अवरामनं लिहिलं की त्या किती चांगल्या कलाकार आहेत, त्या लेजेंड आहेत. काही नेटकऱ्यांनी आशा भोसले यांचा वयाच्या 91 व्या वर्षी असलेला उत्साह पाहून त्यांची खूप स्तुती केली आहे.