IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात मेलबर्न येथे बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) चौथा टेस्ट सामना पार पडला. या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी विजय मिळवत सीरिजमध्ये 1-2 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाला 340 धावांचं आव्हान दिल होतं मात्र टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालनेच केल्या. मात्र 71 व्या ओव्हरला पॅट कमिन्सने त्याची विकेट घेतली. परंतु यशस्वीच्या विकेटवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी देखील अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली.
टीम इंडियाची दुसरी इनिंग सुरु असताना 71 व्या ओव्हरच्या 5 बॉलवर पॅट कमिन्सने यशस्वी जयस्वालला शॉट बॉल टाकला. ज्यावर यशस्वी जयस्वालने पुल शॉट मारला, बॉल विकेटच्या जवळ आला आणि विकेटकिपरने तो पकडला. ज्यानंतर खेळाडूंनी कॅच आऊटसाठी अपील केलं. मैदानातील अंपायरनी खेळाडूंची अपील धुडकावली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी DRS नाही अपील केले. तेव्हा थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यावर निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दिला आणि जयस्वालला बाद घोषित केले.
परंतु टीव्ही रिप्लेमध्ये पाहिल्यावर स्नीको मीटरवर काहीही हालचाल दिसली नाही. यानंतरही अंपायरने जयस्वालला बाद घोषित केले. त्यानंतर जयस्वाल भडकला आणि अंपायरशी याबाबत बोलायला गेला. परंतु थर्ड अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केल्याने जयस्वालला खाली मन घालून पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. स्नीको मीटरमध्ये कोणतीही हालचाल नसतानाही, रिप्ले पाहताना असे दिसते की बॉल बॅटला लागला आहे परंतु स्नेको मीटरवर तसे दिसत नव्हते. या संभ्रमानंतर अंपायरने फलंदाज जयस्वालला आऊट घोषित केले. त्यानंतर माजी क्रिकेटर सुनील गावसकर भडकले आणि थर्ड अंपायरचा हा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव, पण WTC फायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य? कसं आहे समीकरण?
सुनील गावसकर कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना त्यांनी अंपायरनी जयस्वालला बाद ठरवल्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. ते म्हणाले, "हा अंपायरचा चुकीचा निर्णय आहे. हे स्पष्टपणे यशस्वी नॉट आऊट आहे. अंपायरचा हा निर्णय चुकीचा आहे". गावसकर पुढे म्हणाले की, "जर तंत्रज्ञानाचा पुरावा घ्यायचा नसेल, तर मग कशाचा घ्यायचा? ही विकेट भारतीयांसाठी मोठा प्रश्न असेल". सुनील गावसकरच नाही तर इतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी देखील याबाबत ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सोशल मीडियावर देखील फॅन्स जयस्वालच्या विकेटचा निर्णय हा अयोग्य असल्याचं म्हणत आहेत.
Yashaswi jayaswal was clearly not out. Third umpire should have taken note of what technology was suggesting. While over ruling field umpire third umpire should have solid reasons . BCCI ICC ybj19
— Rajeev Shukla (ShuklaRajiv) December 30, 2024
"I can see the ball has made contact with the gloves. Joel, you need to change your decision."
And with that, Jaiswal is out! AUSvIND pic.twitter.com/biOQP4ZeDB
— 7Cricket (7Cricket) December 30, 2024
"If the evidence of the technology is not to be taken, why have it at all? That is something that would definitely be the query as far as the Indians are concerned."
- Sunil Gavaskar on the Jaiswal DRS call AUSvIND pic.twitter.com/Xv6f9VlysM
— 7Cricket (7Cricket) December 30, 2024
The Jaiswal dismissal. The crowd is not having it. Been chanting non stop for 10 mins now BGT oxingDayTest pic.twitter.com/3WsqHipNbI
— Gaurav Kapur (gauravkapur) December 30, 2024
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप