नाशकात १२२ जागांसाठी ८५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक महानगर पालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतदान होतंय. शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Updated: Feb 21, 2017, 08:45 AM IST
नाशकात १२२ जागांसाठी ८५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात title=

नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतदान होतंय. शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

महापालिका निवडणुकांसाठी आता नाशिक सज्ज झालंय.122 जागंसाठी आज मतदान होत आहे. तब्बल 851 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे.

शहरातील 124 इमारतींमधील 1 हजार 407 केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वाधिक म्हणजे 61 मतदान केंद्र आहेत. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वात कमी म्हणजे 31 केंद्रांवर मतदान होणार आहे. 7 हजार 745 कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी झालेत. 10 लाख 73 हजार 407 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात 5 लाख 70 हजार 699 महिला मतदार, 5 लाख 2 हजार 636 पुरूष तर 72 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 

एका प्रभागातून चार उमेदवारांसाठी पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया राबवली जातेय. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने मतदारांचं प्रबोधनही केलं जातंय. मतदान यंत्रात बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे. 279 मतदान केंद्र संवेदनशील तर 86 मतदानकेंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.