नाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2017, 08:09 AM IST
नाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ title=

नाशिक, नागपूर : राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.

नाशिकमध्ये एका मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे मतदान बंद पडले असून अधिकाऱ्यांना तात्काळ बोलविण्यात आले. तर अंबड भागात बोगस मतदान करण्यासाठी जात असताना काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मिनी ट्रकमधून नागरिक मतदानाला चालले होते. अंबड भागाच्या जनता विद्यालयातील प्रकार उघड झालाय. तर नाशिक शहरामधील एका मतदान केंद्रावरील बिघाड दुरूस्त झाल्यानंतर अखेर अर्धा तासांच्या प्रयत्नांनंतर मतदान सुरळीत सुरु झाले.

तर राज्याची उपराजधानी नागपुरात बोगस मतदानाची घटना पुढे आली. प्रभाग 38 मधील यशोदा नगर शाळेत बोगस मतदान झाले. कुलकर्णी नावाच्या महिलेचे मतदान झाले. आधीच मतदान झाल्याने झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

पुण्यातही काही ठिकाणी गोंधळ आहे. काही ठिकाणी मतदान यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी मतदान केंद्र सापडत नाही तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदारांना वेगवेगळे मतदान केंद्र आहे.

कोल्हापुरातही तिच परिस्थिती आहे. शिये इथील हनुमाननगर इथे मतदान केंद्रावर आधार कार्ड ओळखपत्र म्हणून स्वीकारत नसल्याने मतदान प्रक्रिया नागरिकांनी थांबवली गेली.

मुंबईत मुलुंड येथील मतदान प्रक्रिया संथ गतीने असल्याने तरुण उत्कर्ष नगर केंद्रावर मतदारांचा संताप आहे. तासभरापासून मतदानावर गोंधळ आहे. भायखळा पूर्वेकडील महापालिका शाळेतही मतदानादरम्यान अडचणी येत आहेत. मतदारांच्या स्लीपवर वर्गांचे खोली क्रमांक लिहिण्यात आले असून मतदान केंद्र क्रमांक छोट्या अक्षरात लिहीण्यात आल्याने मतदारांचा गोंधळ उडाला आहे. तर बूथ क्रमांक ११ येथील मशीन बंद पडल्याने तेथील मतदानही थांबले आहे. हा गोंधळ पाहून सर्व पक्षीय उमेदवारांनी केंद्रावर धाव घेतली आहे.