मतदान करा फरक पडतो: आम्हाला पाठवा तुमचा मतदान 'सेल्फी'

आपल्या देशाचं खरं आभूषण असणाऱ्या लोकशाहीचा सण साजरा करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. राज्यात आज 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदा आणि 118 पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतंय. सकाळी साडे सातवाजता या उत्सावाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदार राजाला आपला हक्क बजावता येणार आहे. पण गेल्या काही दिवसात मतदार राजा या उत्सवाकडे पाठ फिरवतोय. 

Updated: Feb 21, 2017, 09:50 AM IST
मतदान करा फरक पडतो: आम्हाला पाठवा तुमचा मतदान 'सेल्फी' title=

मुंबई : आपल्या देशाचं खरं आभूषण असणाऱ्या लोकशाहीचा सण साजरा करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. राज्यात आज 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदा आणि 118 पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतंय. सकाळी साडे सातवाजता या उत्सावाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदार राजाला आपला हक्क बजावता येणार आहे. पण गेल्या काही दिवसात मतदार राजा या उत्सवाकडे पाठ फिरवतोय. 

गेल्या महापालिका निवडणूकीत मुंबईत अवघं 44 टक्के मतदान झालं. हे निश्चितच जबाबदार नागरिक असल्याचं लक्षण नाही. मतदान केल्यानं फरक पडतो. झी २४ तास तुम्हाला मतदान करण्याचं आवाहन करत आहे. आम्हाला तुमचा मतदान केल्यानंतरचा सेल्फी पाठवा. ट्विटरवर @zee24taasnews आणि #मतदान_करा_फरक_पडतो असं लिहून पाठवा.