टीम इंडिया

विराट कोहली ठरला `मॅन ऑफ द मॅच`!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीवर टीम इंडियाची भिस्त आहे. टीममध्ये विराट आणि रोहित शर्मा इनफॉर्म बॅट्समन आहेत कोहलीनंही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये ‘विराट’ इनिंग्ज खेळत आपल्यावरील विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवला.

Dec 22, 2013, 09:46 PM IST

सचिन संघात नसल्याचं सत्य पचवावंच लागेल - धोनी

‘सचिनचं संघात नसणं सगल्या टीमला पचवावंच लागेल’ असा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिलाय.

Dec 18, 2013, 08:17 AM IST

धोनीची चूक ‘टीम इंडिया’ला पडली भारी...

सलग सहा वन-डे सीरिज जिंकत धोनी ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत पोहचली होती. त्यामुळे माहीच्या टीमला या सीरिजमध्ये विजयाची पसंती देण्यात आली होती.

Dec 12, 2013, 04:54 PM IST

दर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमवला होता. त्यामुळं आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष लागून आहे. आजचा सामना हा भारताच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार दीड वाजता दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Dec 8, 2013, 10:19 AM IST

टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला विवाहबद्ध, कार्तिकचा वाङनिश्चय

टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला लग्नाच्या बेडित अडकला. मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी त्यांने सात फेरे घेतले. तर दिनेश कार्तिकचा दीपिकाशी साखरपुडा झाला.

Nov 30, 2013, 08:23 AM IST

भारताचा सीरिजवर ताबा; धवनची शानदार सेंच्युरी!

कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.

Nov 27, 2013, 08:07 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान बॅट्समन सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ आपल्या पारंपरिक गणवेशाला फाटा देत चक्क सचिन रमेश तेंडुलकर २०० वी टेस्ट असं छापलेली जर्सी तयार केली आहे.

Nov 14, 2013, 10:35 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध १५ सदस्यीय टीम इंडियाची मुंबईत घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्टच्या सीरिजसाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे. वन-डेत आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी बॉलर्सची धुलाई करणा-या रोहित शर्माला टेस्ट स्क्वॉडमध्ये संधी देण्यात आली आहे.

Oct 31, 2013, 02:23 PM IST

क्रिकेट वेळापत्रक जाहीर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

मायदेशात वेस्टइंडिज बरोबर टीम इंडियाचे सामने होत आहे. २०० व्या कसोटी सामन्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होत आहे. त्यानंतर डिसेंबर महिण्यात भारत टीम दक्षिण दौऱ्यावर जात आहे. या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Oct 31, 2013, 01:05 PM IST

कोहलीच्या ‘विराट’ खेळीनं टीम इंडियानं गाठलं ‘शिखर’!

टीम इंडियानं पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवत अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये कांगारूंचा ६ विकेट्स आणि ३ बॉल्स राखून पराभव करत दणदणीत विजयाची नोंद केली आणि सीरिजमध्ये बरोबरी साधली. टीम इंडियाच्या या अतिशय रोमहर्षक विजयाचा शिल्पकार ठरला तो सेंच्युरियन विराट कोहली आणि शिखर धवन.

Oct 31, 2013, 10:30 AM IST

टीम इंडियात कमी तिथे `शमी`!

पावसात वाहून गेलेल्या रांची वन-डेमुळे टीम इंडियाचं नंबर वन स्थान अबाधित राहिलं असलं. तरी टीम इंडियासाठी रांची वन-डेत आणखी एक चांगली बातमी मिळाली ती मोहम्मद शमीच्या रूपात...

Oct 24, 2013, 07:56 PM IST

धोनीनं कमावलं, ईशांतनं गमावलं!

बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळं तिसऱ्या मोहाली वन-डेमध्ये भारताच्या पदरी पराभव पडला. धोनीची सेंच्युरी आणि कोहलीच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं कांगारुंसमोर ३०४ रन्सचं आव्हान उभं केलं होतं. मात्र भारतीय बॉलर्स कांगारुंच्या बॅट्समनला वेसण घालण्यात अपयशी ठरले. यामुळंच टीम इंडियाला तिसऱ्या वन-डेमध्ये ४ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली.

Oct 20, 2013, 08:42 AM IST

धोनीनं सुरू केली ‘2015 वर्ल्डकप’ची तयारी!

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनं आता 2015च्या वर्ल्डकपची तयारी सुरू केलीय. ‘व्हिजन 2015’ डोळ्यासमोर ठेवून धोनी टीममध्ये आतापासूनच काही बदल करतोय.

Oct 15, 2013, 02:35 PM IST

पराजयाचे मानकरी बॅट्समनच – धोनी

ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या वनडे मॅचमधील टीम इंडियाच्या पराजयला बॅट्समनच जबाबदार असल्याचं कॅप्टन कूल धोनीनं म्हटलंय. मैदानात जम बसल्यानंतर शॉट्सची निवड करतांना बॅट्समननं सावधगिरी बाळगायला हवी होती, असंही धोनी म्हणाला.

Oct 14, 2013, 04:05 PM IST

स्कोअरकार्ड- पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया

पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया

Oct 10, 2013, 08:03 PM IST