www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मायदेशात वेस्टइंडिज बरोबर टीम इंडियाचे सामने होत आहे. २०० व्या कसोटी सामन्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होत आहे. त्यानंतर डिसेंबर महिण्यात भारत टीम दक्षिण दौऱ्यावर जात आहे. या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका दौरा कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली होती. अनेक वादविवादानंतर आणि चर्चा विनिमयानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. जोहान्सबर्ग येथे ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने भारताच्या या दौऱ्याला सुरुवात होईल.
भारतीय संघ १८ ते २२ डिसेंबरदरम्यान जोहान्सबर्ग येथे पहिला कसोटी सामना खेळेल. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान दरबन येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने जुलै महिन्यात स्वत:च या मालिकेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर हारून लॉरगेट यांची नियुक्ती केल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नाराजी व्यक्त केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.