धोनीनं सुरू केली ‘2015 वर्ल्डकप’ची तयारी!

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनं आता 2015च्या वर्ल्डकपची तयारी सुरू केलीय. ‘व्हिजन 2015’ डोळ्यासमोर ठेवून धोनी टीममध्ये आतापासूनच काही बदल करतोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 15, 2013, 02:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनं आता 2015च्या वर्ल्डकपची तयारी सुरू केलीय. ‘व्हिजन 2015’ डोळ्यासमोर ठेवून धोनी टीममध्ये आतापासूनच काही बदल करतोय.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या सात वनडे मॅचच्या पहिल्या मॅचमध्ये सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. दुसऱ्या सामन्यातही तो चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सुरेश रैनाला आता चौथ्या स्थानावर बढती देण्यात आलीय.
भविष्याचा विचार करताना धोनीनं या स्थानावर एकच खेळाडू कायम राहण्यासाठी रैनाला बढती दिल्याचं कळतंय. सध्या या जागेवर युवराज सिंग खेळतोय. मात्र युवराजचं टीममधलं स्थान कायम नसल्यानं युवीच्या जागी रैनाची निवड करण्यात आलीय.
``रैना हा सहाव्या क्रमांकावर खेळायला येत असल्यानं त्याला पुरेशी संधी मिळत नाही. तो चुकीचे फटके मारून बाद होतो. त्यामुळं त्याला संधी देणं गरजेचं आहे. आम्ही प्रत्येक जागेसाठी दोन फलंदाज तयार करण्याचा विचार करत आहोत,`` असं धोनीनं सांगितलंय.
आता सचिनही निवृत्त होतोय. त्यामुळं आता टीममध्ये आणखी कोणकोणते बदल करण्यात येतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.