वेस्ट इंडिजविरुद्ध १५ सदस्यीय टीम इंडियाची मुंबईत घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्टच्या सीरिजसाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे. वन-डेत आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी बॉलर्सची धुलाई करणा-या रोहित शर्माला टेस्ट स्क्वॉडमध्ये संधी देण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 31, 2013, 02:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्टच्या सीरिजसाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे. वन-डेत आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी बॉलर्सची धुलाई करणा-या रोहित शर्माला टेस्ट स्क्वॉडमध्ये संधी देण्यात आली आहे.
रोहितला टेस्ट पदार्पण करण्याची संधी आहे. तर अजिंक्य रहाणेसह, मोहम्मद शमीलादेखील टीममध्ये संधी देण्यात आली आहे. प्रग्यान ओझा, अमित मिश्रासह आर. अश्विन या तीन स्पिनर्सची निवड झाली आहे. दुखापतीतून सावरलेल्या उमेश यादवचीही टीममध्ये वर्णी लागली आहे.
दुसरीकडे झहीर खानला वगळण्याचा निर्णय सिलेक्टर्सनी घेतला आहे. आऊट ऑफ फॉर्म असणा-या दिल्लीकर ईशांत शर्माची मात्र सिलेक्टर्सनी निवड कायम ठेवली आहे.
अशी आहे टीम :
महेंद्रसिंग धोणी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अश्विन, भुवनेश्वर कुमार, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा, अजिंक्य रहाणे, उमेश यादव, समी अहमद, रोहित शर्मा, ईशांत शर्माचा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.