भारताचा सीरिजवर ताबा; धवनची शानदार सेंच्युरी!

कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 27, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कानपूर
कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली. ११९ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळणारा शिखर धवन टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तर भारतीय टीमचा हा सलग सहावा सीरिज विजय ठरला आहे.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर शिखर धवनच्या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजनं ठेवलेलं २६४ रन्सचं आव्हानात्मक टार्गेट भारतीय टीमनं ४६.१ ओव्हर्समध्येच पार केलं. शिखर धवननं ११९ रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळ टीम इंडियाला विजय साकारुन दिला. त्याला युवराज सिंगनं हाफ सेंच्युरी झळकावत चांगली साथ दिली. युवराज सिंगनं ५५ रन्सची महत्वपूर्ण इनिंग खेळली. शिखर धवनच्या शानदार बॅटिंगसमोर वेस्ट इंडिजच्या बॉलर्सचं काहीच चालल नाही. या विजयासह टीम इंडियानं तीन वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये २-१ नं बाजी मारली. भारतीय़ टीमनं २०१३च्या क्रिकेट सीझनमध्ये सहाव्या सीरिज विजयाची नोंदही केली.
तत्पूर्वी, टीम इंडियानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. पॉवेल आणि सॅम्युअल्सच्या अनुक्रमे ७० आणि ७१ रन्सच्या जोरावर विंडीजनं ५० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून २६३ रन्स केले. २६४ रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा अवघ्या ४ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर विराटही फारशी कमाल करु शकला नाही. विराट-रोहित आऊट झाल्यावर धवन आणि युवराजनं टीम इंडियाची आणखी पडझड होऊ दिली नाही. आणि भारतीय टीमचा विजयाचा मार्ग आणखी सुकर करून दिला. शिखर धवन मॅन ऑफद मॅचचा मानकरी ठरला. तर विराट कोहलीला ‘मॅन ऑफ द सीरिज’च्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा टीम इंडियानं वन-डेत आपला विजयी सिलसिला कायम ठेवला. आता दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्यावर भारतीय टीमकडून अशाच कामगिरीची अपेक्षा क्रिकेट फॅन्सना असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.