जंतर मंतर

'आता मागे हटणार नाही जोपर्यंत...' ब्रिजभूषण सिंगविरोधात भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम

महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही

Apr 28, 2023, 05:39 PM IST

'विवाहीत' मोदींसोबत करायचाय विवाह... महिला महिनाभरापासून उपोषणावर

विविध आंदोलनकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं जंतर-मंतर आता लवकरच पर्यावरणीय कारणांसाठी आंदोलनांसाठी बंद होणार आहे. परंतु, याच मैदानावर गेल्या महिनाभरापासून एक महिला उपोषणाला बसलीय... तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लग्न करायचंय. 

Oct 7, 2017, 05:26 PM IST

'२१-२२ नोव्हेंबरला १० लाख शेतकरी जंतर-मंतरवर'

येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला दहा लाख शेतक-यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय.

Aug 13, 2017, 08:47 PM IST

'बिग बॉस'फेम ओम स्वामींना धू - धू धूतलं!

'बिग बॉस'मधलं वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेल्या ओम स्वामी पुन्हा एकदा वादात पडलेत. यावेळी, मात्र वाद बडबडीपुरता मर्यादीत न राहता हाणामारीवर येऊन ठेपला... आणि स्वामीजींना सार्वजनिक ठिकाणी फटकेही खावे लागले.

Jul 12, 2017, 04:22 PM IST

दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की

सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

Aug 14, 2015, 02:48 PM IST

आंदोलनकर्ते योगेंद्र यादव पोलिसांच्या ताब्यात

येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणारे स्वराज अभियानेच नेते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी यादव यांना नोटीस पाठवून मैदान खाली करण्याचे बजावले होते. मात्र, आंदोलन सुरु असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Aug 11, 2015, 12:45 PM IST

स्वतंत्र विदर्भासाठी `जंतर मंतर`वर आंदोलन!

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते आता आक्रमक झाले आहेत. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला जंतरमंतर मैदानावर प्रातिनिधिक आंदोलन करण्यात येणार आहे.

Aug 3, 2013, 05:54 PM IST

अण्णा काढणार 'पक्ष', म्हणे द्या माझ्याकडे 'लक्ष'

अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.

Aug 2, 2012, 05:43 PM IST

अण्णांचा एल्गार!

 

 

 

 

 

---- 

Aug 2, 2012, 03:05 PM IST

अण्णा आले, गर्दीही आली!

जनलोकपालच्या आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सकाळपासूनच उपोषणाला सुरूवात केलीय. अण्णांनी सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय त्यामुळे अण्णाही टीम अण्णासोबत उपोषणात सहभागी झालेत.

Jul 29, 2012, 12:34 PM IST

अण्णा आजपासून बसणार उपोषणाला...

अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.

Jul 29, 2012, 09:48 AM IST

गर्दी नको तर दर्दी हवेत - अण्णा हजारे

अण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय. आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, ना कोणता पक्ष काढणार... लोकपाल बिलासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.

Jul 28, 2012, 02:20 PM IST

'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.

Jul 26, 2012, 08:47 PM IST