अण्णा आजपासून बसणार उपोषणाला...

अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.

Updated: Jul 29, 2012, 09:48 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.

 

टीम अण्णांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस... भ्रष्टाचार विरधात आणि जनलोकपालसाठी गेल्या चार दिवसांपासून अण्णांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यात अण्णाही आजपासून सहभागी होणार आहेत. त्यामुळं जंतरमंतरवर पुन्हा गर्दी होईल, अशी आशा आहे. भ्रष्ट मंत्री, भ्रष्टाचार, लोकपाल या मुद्यांवरुन टीम अण्णानी छेडलेल्या आंदोलनाला दिल्लीसह मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळतोय. सरकारी पातळीवरुनही आंदोलनाबाबत प्रतिसाद मिळाला नाही. ‘मी निवडणूक लढवणार नाही, कुठलाही राजकीय पक्ष काढणार नाही’ अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ अण्णा हजारे यांनी शनिवारी दिली.  व्यासपीठावरुन अण्णांनी केलेल्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळत होती. आपल्या जोशपूर्ण भाषणात अण्णांनी सरकारवर हल्लाबोल केला.

 

.