12 दिवसांमध्ये 'या' चित्रपटाने केली बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई

'बेबी जॉन', 'गेम चेंजर', 'इमर्जन्सी' आणि 'आझाद' सारखे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र, यातील काही चित्रपट खूप मोठ्या बजेटचे होते, परंतु चांगली स्टारकास्ट असूनही हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरले.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 26, 2025, 05:03 PM IST
12 दिवसांमध्ये 'या' चित्रपटाने केली बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई title=

Madha Gaja Raja Box Office 12: काही दिवसांपूर्वी 'बेबी जॉन', 'गेम चेंजर', 'इमर्जन्सी' आणि 'आझाद' सारखे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. यामधील काही चित्रपटाचे बजेट खूप मोठे होते. त्यासोबतच या चित्रपटांमधील कलाकार देखील चांगले होते. मात्र, हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरले. परंतु, 12 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाचे नाव 'माधा गज राजा' असे आहे. 'माधा गज राजा' हा चित्रपट दीर्घकाळ रखडलेला होता. जो 12 वर्षांनंतर प्रथमच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

12 दिवसांमध्ये बजेटपेक्षा तीन पट अधिक कमाई

'माधा गज राजा' हा एक ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये सुपरस्टार विशाल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस झाले असून 12 दिवसांमध्ये 'माधा गज राजा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट केवळ 15 कोटी रुपये इतके होते. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, विशालच्या या चित्रपटाने भारतात 40.76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने जगभरात 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  

12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या 'माधा गज राजा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद आणि प्रसिद्धी मिळत आहे. चित्रपटातील खास कथानकामुळे ॲक्शन-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या चित्रपटातील संथानमचे वन-लाइनर्सही प्रेक्षकांना आवडत आहेत. 'माधा गज राजा' चित्रपट यापूर्वी 2013 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मिती आणि आर्थिक समस्यांमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. जो आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्यामधून हा चित्रपट पुढील दिवसांमध्ये देखील चांगली कमाई करू शकतो असं देखील म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु आहे.