अण्णा काढणार 'पक्ष', म्हणे द्या माझ्याकडे 'लक्ष'

अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.

Updated: Aug 2, 2012, 05:43 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

 

अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे.  ते म्हणाले,  राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची  गरज आहे. त्यामुळे आता अण्णाही अप्रत्यक्षरित्या राजकारणात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

तर टीम अण्णा उद्या (शुक्रवार) सायंकाळी उपोषण सोडणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली. टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी  होऊ लागली होती. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केलं होतं. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे. देशाला सशक्त राजकीय पर्याय हवाय, तो टीम अण्णांनी द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. देशाच्या जनतेकडून यासंदर्भात आपली मतं मागवावीत असं आवाहनही करण्यात आलं आहे.

 

जनलोकपालसाठी लढा देणाऱ्या टीम अण्णांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अण्णांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. तर टीम अण्णांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. शरीरात प्राण असेपर्यंत लढणार असल्याचं इशारा टीम अण्णांनी दिला होता.. अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली असून मागे हटण्यास ते तयार नाहीत. अण्णांच्या कोअर कमिटीनंही त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.