'मला माफ कर', कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी

हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढाई लढत आहे. अशातच हिनाने बॉयफ्रेंड रॉकीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 26, 2025, 01:25 PM IST
'मला माफ कर', कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी title=

Hina Khan Cancer: टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. तिने गेल्या वर्षी चाहत्यांना सांगितले होते की ती ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढाई लढत आहे. हिना खानवर स्टेज 3 साठी उपचार सुरू आहेत. मात्र, या आजाराशी लढताना तिने अद्याप हार मानली नाहीये. ती धैर्याने या आजाराविरुद्ध लढताना दिसत आहे. ती नेहमी इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्य आणि उपचारांशी संबंधित माहिती शेअर करत असते. 

दरम्यान, तिच्या या कठीण काळात तिच्या कुटुंबासह तिचे चाहते आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल देखील तिच्यासोबत उभा आहे. अशातच अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या कठीण काळात रॉकी तिच्यासोबत कसा उभा आहे आणि तिला कशी साथ देत आहे, हे हिना खानने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्याच बरोबर हिना खानने तिच्या पोस्टसोबत रॉकीसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील  शेअर केले आहेत. ज्यामध्ये रॉकी तिच्यासोबत वेळ घालवताना आणि तिची काळजी घेताना दिसत आहे. 

हिनाची रॉकीसाठी भावनिक पोस्ट

हिना खानने रॉकीचे आभार मानत पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'तू अशी व्यक्ती आहेस ज्याने माझ्या कठीण काळात मला नेहमीच साथ दिली. जेव्हा मी माझे डोके मुंडण केले तेव्हा तू पण केलेस आणि जेव्हा माझे केस वाढू लागले तेव्हा तू देखील केस वाढवायला सुरुवात केलीस. तू माझी काळजी घेतोस, नेहमी 'मी तुझ्या पाठीशी आहे' असे म्हणतो आणि कठीण प्रसंगी हार न मानता तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. आम्ही दोघांनी मिळून खूप त्रास सहन केला, विशेषत: कोरोना महामारीच्या काळात, जेव्हा आम्ही आमचे वडील गमावले आणि एकमेकांचा आधार बनलो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आजही तू माझ्यासोबत आहेस. माझी काळजी घेत आहेस. या प्रवासाने मला खूप काही शिकवलं आहे. खरंच तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भाग आहेस. यासोबतच या पोस्टमध्ये अभिनेत्रीने बॉयफ्रेंड रॉकीची माफी देखील मागितली आहे. त्यासोबतच तिने आपले प्रेम व्यक्त करताना रॉकीला I love You असे देखील लिहिले आहे. हिना खानची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे. चाहते हे जोडपे असेच राहो, अशी प्रार्थना करत आहेत. हिनाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स आल्या आहेत.