केडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय.
Nov 2, 2015, 06:43 PM ISTमुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत भाजपची पिछेहाट
एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येतायत. या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत पक्षाची पिछेहाट झाली आहे.
Nov 2, 2015, 05:12 PM ISTशिवसेनेचे बहुमत हुकले, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरच
भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला अपेक्षित असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेने आपला गड राखला. याचा आनंद शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहतोय. त्यात भर पडली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये येणार असल्याची वृत्ताची. मात्र, बहुमत न मिळाल्याने उद्धव यांचा दौरा अचानक रद्द झालाय.
Nov 2, 2015, 04:55 PM IST'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं'
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.
Nov 2, 2015, 02:36 PM ISTपालिका निवडणूक : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, निकालाकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:05 PM ISTकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का घसरल्याने सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Nov 1, 2015, 08:57 PM ISTपालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी
महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Nov 1, 2015, 08:41 PM ISTडोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला
कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.
Nov 1, 2015, 07:23 PM ISTकेडीएमसीत ४८ तर कोल्हापुरात ६४ टक्के मतदान, लक्ष निकालाकडे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी कमी मतदान झाल्याचे नोंद झालेय. येथे ४८ टक्के मतदान तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगले मतदान झाले. कोल्हापुरात ६४ टक्के मतदान झालेय. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता टिपेला पोहचलीय. दरम्यान, कल्याण डोंबिवलीत भाजपा - मनसे कार्यकर्ते भिडलेत. मनसेच्या सुभाष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर तलवार हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 1, 2015, 06:13 PM ISTकल्याणमध्ये दुपारी मतदारांच्या रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 05:00 PM ISTकेडीएमसी निवडणूक : सेना खासदार, आमदारांना नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग
निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी उडालेली पाहिली. आता दोन्ही राजकीय पक्षांना पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. शिवसेना खासदार, आमदार यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग झालास, असा आरोप शिवसेनेने केलाय.
Nov 1, 2015, 04:21 PM ISTकडोंमपा निवडणूक: कल्याणचा गरीबाचा पाडा प्रभाग ५० संवेदनशील
Nov 1, 2015, 02:43 PM ISTकल्याण: सकाळपासूनच मतदारांच्या रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:57 AM ISTझी हेल्पलाईन : डोक्यावर हंडा, कडेवर तान्हुलं... पाण्यासाठी वणवण!
डोक्यावर हंडा, कडेवर तान्हुलं... पाण्यासाठी वणवण!
Oct 31, 2015, 09:16 PM IST