'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं'

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.

Updated: Nov 2, 2015, 02:36 PM IST
'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं' title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.

या विजयाचं श्रेय जनतेला देत त्यांनी 'खोट्या पॅकेजला किंवा फसव्या ब्लू प्रिंटला नाही तर विकासकामांना जनतेनं मतदान केलं... जनतेनं शिवसेनेवर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच शिवनेना या भागात बहुमत मिळवू शकली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 

भरसभेत दिसलेलं राजीनामा नाट्य फळाला आलं का? या प्रश्नावर 'मी आयुष्यात कधीही नाटक केलेलं नाही... त्या राजीनाम्यामध्ये कुठलंही नाटक नव्हतं... मी राजीनाम्याचं खोटं नाटक केलं असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे माहित आहे... पण, सत्तेचा दुरुपयोग होताना मी पाहू शकत नव्हतो, कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला गेला त्यामुळेच राजीनामा दिला होता' असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 

तसंच यावेळी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची पुण्याई आणि उद्धव ठाकरे यांचं खंबीर नेतृत्व यामुळे हा विजय सहजसाध्य झाला, असं म्हणत ही विरोधकांना चपराक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

त्यामुळे, आता हेच चित्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकांतही दिसणार का? अशी उत्सुकता लागून राहिलीय. 

पाहा संपूर्ण निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.