कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का घसरल्याने सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बोगस मतदान केल्याप्रकरणी एकाला पकडण्यात आलंय. या व्यक्तीकडे काही बोगस कार्ड सापडलीत. बोगस मतदानप्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, डोंबिवलीतल्या पाथर्लीत भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उसळलीय. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या या वादातून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झालाय. या तलवार हल्ल्यात भाजपचे नितीन पालन जखमी झालेत. या वादावादीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. असे असले तरी भाजपनं मनसे कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.