मुंबई : एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येतायत. या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत पक्षाची पिछेहाट झाली आहे.
अधिक वाचा : Live Update : महापालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकाल
सर्वात धक्कादायक निकाल नागपूरमध्ये लागलेत. बीड जिल्ह्यातल्या ४ नगर पंचायतींपैकी ३ पंचायती राष्ट्रवादीनं ओढून आणल्यात यामुळे महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना दणका दिलाय. तर जालना जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना धक्का बसलाय. जाफराबाद आणि घनसावंगी नगर परिषदेत राष्ट्रवादीनं मुसंडी मारली.
अधिक वाचा : शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला
विदर्भातही भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांत नगर पंचायतींमध्ये काँग्रेसनं बाजी मारली आहे. एकूण राज्याचं चित्र बघता शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळतेय.
मात्र नगरपरिषदा आणि नगर पंचायतींचे निकाल बघता लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पराभवाने मरगळ आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नवी उभारी मिळाली आहे. तर भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.