दुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?

WTC Points Table : पराभवामुळे टीम इंडियाला WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पुजा पवार | Updated: Dec 9, 2024, 12:33 PM IST
दुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामान्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात असून यातील दुसऱ्या सामन्यात रविवारी भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-1  अशी बरोबरी साधली. या पराभवामुळे टीम इंडियाला WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. तसेच पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी घसरण झालीये. त्यामुळे आता WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पुढील वर्षी लंडनमध्ये होणार WTC Final : 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या चक्रामध्ये आता फक्त काही सामने शिल्लक आहेत. जून 2025 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाचे फक्त तीन टेस्ट सामने शिल्लक आहेत. हे सर्व सामने त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायचे आहेत. पर्थ येथे झालेला पहिला टेस्ट सामना जिंकून टीम इंडिया WTC पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली होती. तर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित 4 पैकी 3 सामने जिंकणं गरजेचं होतं, मात्र आता एडिलेड येथील सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर घसरली. 

हेही वाचा : अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना

 

ऑस्ट्रेलिया नंबर 1 वर : 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया नंबर 1 वर पोहोचली आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी 60.71 इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर साऊथ आफ्रिका असून त्यांच्या विजयाची टक्केवारी 59.26 आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताची टक्केवारी ही 57.29 आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवाने टीम इंडियाला अडचणीत आणले. गाबा टेस्टपूर्वी, भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित 3 टेस्ट सामन्यांपैकी आणखी दोन जिंकणे आणि एक सामना ड्रॉ करणे आवश्यक आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक : 

पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी