Maharashtra Guardian Ministers : महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या. 19 जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द करण्यात आली. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले.
पालकमंत्रिपदावरून डावलल्याच्या चर्चांवर दादा भुसेंची प्रतिक्रिया दिलीये. पालकमंत्रिपदावरून डावललेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधी चर्चा केली होती. अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिलीये. तर पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणं हे कार्यकर्त्यांचं काम असल्याचंही त्यांनी म्हटलंय..
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सामूहिक राजीनामे दिले. रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद न दिल्यान शिवसैनिक नाराज झालेत.
महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आलंय.. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय.. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आलीये.. भरत गोगावले आणि दादा भूसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलीये.. तर हा महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा निर्णय आहे.. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय..