Saif Ali Khan Attack : आरोपीला पुन्हा सैफ अली खानच्या घरात घुसणार? मुंबई पोलिस हल्ल्याच्या प्रसंग रिक्रिएट करणार?

मुंबई पोलिस  सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या क्षण रिक्रिएट करणार आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 19, 2025, 10:42 PM IST
 Saif Ali Khan Attack : आरोपीला पुन्हा सैफ अली खानच्या घरात घुसणार? मुंबई पोलिस हल्ल्याच्या प्रसंग रिक्रिएट करणार?  title=

Saif Ali Khan Attacker Arrested: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्या केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी ठाणे येथून पोलिसांनी या आरोपीला अटक केली. यानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे. पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याच्या क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच या संपूर्ण हल्ला प्रकरणाचा खुलासा होणार आहे. 

मोहम्मद शहजाद असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली येथून आरोपी मोहम्मद शहजाद याला अटक करण्यात आली. ओळख लपवण्यासाठी आरोपीनं केस कापल्याची माहिती सोमर आली आहे.  वांद्रे येथील सुट्टीकालीन कोर्टानं आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली. ठाण्यातून अटक केल्यानंतर त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आली आहे. आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टानं आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

आरोपीला अटक झाल्यानंतर लकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आरोपीला घेऊन सैफच्या घरी जाणार आहेत. सैफच्या घरी  पोलीस शहजाद याच्याकडून हल्ल्याचा सिन रिक्रिएट करून घेण्याची शक्यता आहे. नेमका हल्ला कसा केला याची माहिती पोलिस थेट आरोपीला सैफच्या घरी नेऊन घेणार आहेत. 16 जानेवारी रोजी सैफवर हल्ला झाला. यात सैफला गंभीर दुखापत झाली. 

दरम्यान, सैफवर चाकू हल्ला कऱणारा मोहम्मद शहजाद  हा बांगलादेशी असल्याची मोठी माहिती पोलिस तपासात समोर आलीय. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तो बांगलादेशातून भारतात अवैधरित्या आला  आणि ओळख पटू नये म्हणून त्यानं विजय दास असं नाव बदलल्याचा दावाही पोलिसांनी केलाय.