Saif Ali Khan च्या उपचाराचा खर्च किती झाला? Lilavati च्या बिलाची रक्कम समोर

Saif Ali Khan Lilavati Hospital Bill: सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्यावर लिलावती रुग्णालयात 5 तासांची शस्रक्रीया करण्यात आली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 18, 2025, 01:19 PM IST
Saif Ali Khan च्या उपचाराचा खर्च किती झाला? Lilavati च्या बिलाची रक्कम समोर title=
सैफच्या हॉस्पीटल बिलचा तपशील समोर (प्रातिनिधिक फोटो)

Saif Ali Khan Lilavati Hospital Bill: अभिनेता सैफ अली खान सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल असून उपचार घेत आहे. गुरुवारी रात्री वांद्रे येथील सैफच्या राहत्या घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर धारधार शस्त्राने सहा वार केल्याने सैफ गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर दोन शस्रक्रीया करण्यात आल्या आहेत. सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करुन बाहेर काढला असून त्याच्या मानेवर आणि डाव्या हातावर झालेल्या जखमांवरील उपचाराचा भाग म्हणून प्लॅस्टीक सर्जरीही करण्यात आली आहे. मात्र सैफवर सध्या सुरु असलेल्या उपचारांचा खर्च किती आला आहे याची माहितीही समोर आली आहे.

त्या रात्री घडलं काय?

गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास फायर एक्झिटसाठी राखीव असलेल्या जीन्यावरुन सैफच्या घरापर्यंत पोहोचलेल्या हल्लेखोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केला असता सैफ त्याच्या बेडरुमबाहेर आला. त्यावेळी घरात घुसलेला चोर हा सैफसमोरच होता. या चोराने जेहच्या रुमकडे जाण्याचा प्रयत्न केला असता सैफने त्याला आडवलं आणि त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. सैफ मध्ये येत असल्याचं पाहून संतापलेल्या या आरोपीने हातातील धारधार शस्राने सैफवर सहा वेळा वार केले. त्याने सैफच्या मानेवर, डाव्या हतावर वार केला. तसेच सैफच्या पाठीत सुरा खुपसला. सैफने कसं बसं या व्यक्तीला एका रुममध्ये कोंडलं. सैफला जखमी अवस्थेत पाहून कर्मचारी मदतीसाठी धावले. दरम्यान दुसरीकडे आरोपीनेही घटनास्थळावरुन पळ काढला आणि तो आलेल्या मार्गानेच पळून गेला.

रिक्षाने हॉस्पीटलला आणलं

रक्तबंबाळ अवस्थेत सैफला त्याचे मुलगा इब्राहिम आणि तैमूर यांनी रिक्षातून लिलावती रुग्णालयामध्ये नेलं. लिलावतीमध्ये पोहचल्यानंतर गेटवरच सैफने, "स्ट्रेचर घेऊन या, मी सैफ अली खान आहे," असं सुरक्षारक्षकांना सांगितल्याची माहिती सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाने दिली. सैफवर तातडीने दोन शस्रक्रीया करण्यात आल्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या जीवाला कोणताही धोका नसून त्याची प्रकृती स्थीर आहे. सैफने शस्रक्रीयेनंतर हळूहळू चालण्याचाही सराव केला. दरम्यान सैफवर उपचार सुरु असतानाच त्याच्या आरोग्य विम्यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

नक्की वाचा >> Saif Ali khan Attack: करीनाचा खळबळजनक जबाब! हल्ला चोरीच्या उद्देशाने नाही? म्हणाली, 'मी मुलांच्या..'

सैफवरील इलाजासाठी किती खर्च झाला?

सैफच्या विम्यासंदर्भातील व्हायरल माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी सैफवरील उपचारांसाठी करण्यात आलेला कॅशलेस उपचारांचा अर्ज मान्य करण्यात आला आहे. सैफ पाच दिवस रुग्णालयात असेल असंही या अर्जातून स्पष्ट झालं आहे. म्हणजेच सैफला 21 तारखेला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. सैफच्या एकूण इलाजाचा खर्च 35 लाख 98 हजार रुपये इतका झाला आहे. त्यापैकी 25 लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. सैफला गुरुवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर 5 तास शस्रक्रीया सुरु होती. त्याच्या पाठीतून चाकूचा अडीच इंचाचा तुकडा बाहेर काढण्यात आला. 

सैफची प्रकृती स्थीर असून सध्या त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार असून काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे समजते.