'शोले' हा एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे, जो रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केला होता. 1975 मध्ये 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट जगभरात प्रचंड कमाई करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकांची तयारी करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कामासाठी किती मानधन मिळाले हे आपण जाणून घेऊयात. कोणत्या कलाकाराला सगळ्यात कमी मानधन मिळाले हे जाणून तुम्हाला आश्चर्यचं वाटेल.
धर्मेंद्र यांनी या चित्रपटात वीरूची भूमिका साकारली आणि त्यांना 1.50 लाख रुपये मानधन मिळाले. ठाकूरच्या भूमिकेसाठी संजीव कुमार यांना 1.25 लाख रुपये मिळाले. अमिताभ बच्चन यांना 1 लाख रुपये मिळाले. बसंतीची भूमिका साकारण्यासाठी हेमा मालिनींना 75 हजार रुपये मिळाले. गब्बर सिंगच्या भूमिकेतील अमजद खानला 65 हजार रुपये मिळाले. तर जया बच्चन यांना चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी सर्वात कमी म्हणजेच 35 हजार रुपये मिळाले. यांचे मानधन ऐकुन तुम्हाला असे वाटेल की आताच्या काळातील प्रत्येक अभिनेता कोटींनमध्ये मानधन घेतात, त्यामानाने 1975च्या काळात या चित्रपटातील कलाकारांचे मानधन खूप कमी होते. या चित्रपटाचे सगळ्या महत्वांच्या कलाकारांचे मिळून मानधन फक्त 5 लाख 50 हजार रुपये झाले.
हे ही वाचा: सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल
याव्यतिरिक्त, इतर कलाकारांची मानधनसुद्धा उल्लेखनीय होते. मॅक मोहन ज्यांनी सांबाची भूमिका केली त्यांना 12 हजार रुपये मिळाले. तर कालिया म्हणून विजू खोटे यांना 10 हजार रुपये मिळाले. अभिनेता एके हंगल यांना इमाम साहेबांची भूमिका साकारणाऱ्या 8 हजार रुपयांचे मानधन मिळाले.
शोले चित्रपटाच्या निर्मात्यांनी, एका किमान बजेटमध्ये असा अमर चित्रपट तयार करण्यासाठी उत्कृष्ट कलाकारांची निवड केली. ज्यामुळे हा चित्रपट आजही सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे.