टीम इंडियासाठी चिंता ! 'या' खेळाडुच्या डाव्या हाताला दुखापत

 शुभमन गिलच्या डाव्या हाताला दुखापत 

Updated: Feb 16, 2021, 11:30 AM IST
टीम इंडियासाठी चिंता ! 'या' खेळाडुच्या डाव्या हाताला दुखापत title=

चेन्नई : टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. चेन्नईच्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी फिल्डिंग करताना गिलच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. खबरदारीचा उपाय म्हणून गिलच्या डाव्या हाताचं स्कॅन करण्यात आलंय. बीसीसीआयची मेडिकल टीम गिलच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.

अश्विनचे शतक 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात रविचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकलं. अश्विनने त्याच्या टेस्ट करिअरमधील पाचवं शतक ठोकलं. सोबतच त्याने टीका करणाऱ्या लोकांना ही उत्तर दिलं. रविचंद्रन अश्विनसाठी शतक ठोकणं इतकं सोपं नव्हतं. कारण टीम इंडियाचे चांगले चांगले बॅट्समन या पीचवर टीकू शकले नाही. इशांत शर्माची विकेट 237 रनवर पडल्यानंतर दहाव्या विकेटसाठी अश्विनने शानदार कामगिरी केली. चैन्नईच्या क्रिकेट चाहत्यांना त्याने निराश केलं नाही. त्याने त्याच्या होम ग्राऊंडवर शतक ठोकत त्याच्या चाहत्यांना ही खूश केलं.

जो रुटला जीवनदान 

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताची स्थिती अधिक मजबूत होऊ शकली असती. परंतु जो रूटला (Joe Root) एक्झर पटेलच्या चेंडूवर फील्ड अम्पायर नितीन मेननमुळे (Nitin Menon)जीवनदान मिळाले.

विराट अम्पायरवर रागावला

जो रुटला नॉट आऊट दिल्याचे पाहून विराट कोहलीला राग अनावर झाला. थर्ड अम्पायरचा निर्णय आल्यानंतर विराट ऑनफिल्ड अम्पायर मेननकडे गेला आण दोघांमध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.