मुंबई : आयपीएलमध्ये असे असंख्य खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंचे प्रदर्शन चांगले असते, मात्र त्यांची भारतीय संघात निवड होत नाही. आता अशाच एका खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाची जर्सी घालून हा खेळाडू आता कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
आयपीएलनंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे तर नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद केएल राहुलच्या हाती देण्यात आली आहे. राहुल कर्णधार बनल्याने टीम इंडियामध्ये एका अशा गोलंदाजाला संधी मिळाली आहे, ज्याची गेल्या अनेक वर्षापासून निवड झाली नव्हती.
तीन वर्षानंतर निवड
केएल राहुलने एका अशा खेळाडूला संघात स्थान दिले, जो तीन वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत होता, परंतु त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. हा खेळाडू दुसरा कोणी नसून स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आहे. अर्शदीप हा गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमधील सर्वात मोठा डेथ बॉलर म्हणून उदयास आला आहे. यामुळे त्याला आता आगामी आफ्रिकन मालिकेसाठी टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. अर्शदीप पहिल्यांदाच भारतीय संघाच्या जर्सीत दिसणार आहे.
आयपीएल कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळलेल्या अर्शदीप सिंगची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. आयपीएल 2022 मध्ये अर्शदीपने 14 सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या विकेट्स कमी असतील पण त्याला संधी मिळाली आहे. कारण शेवटच्या षटकांमध्ये त्याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी कोणी करू शकला नाही.
भारतीय T20 संघ:
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल , रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.