दहा वर्षाने लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, दिग्गज फुटबॉलपटूच्या आयुष्यात आलं वादळ ?

 गेल्या 12 वर्षापासून हे जोडपे रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यांनी लग्न केले नव्हते. दोघांना या रिलेशनशिपपासून दोन मुलेही आहेत.

Updated: Jun 2, 2022, 03:10 PM IST
दहा वर्षाने लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, दिग्गज फुटबॉलपटूच्या आयुष्यात आलं वादळ ?  title=

मुंबई : प्रसिद्ध पॉप सिंगर शकीरा आणि बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलर गेरार्ड पीके यांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या 12 वर्षापासून हे जोडपे रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यांनी लग्न केले नव्हते. दोघांना या रिलेशनशिपपासून दोन मुलेही  आहेत. दरम्यान या ब्रेकअपवर अद्याप दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही आहे. मात्र या ब्रेकमागचं कारण अद्याप समोर आली नाही आहे. 

2010 फिफा वर्ल्ड कपचं अ‍ॅथम सॉंग 'वाका-वाका' जगभरात चर्चीले गेले होते. या गाण्यात शकीराने डान्स केला होता. या गाण्यानंतर जगभरातले चाहते तिला ओळखू लागले होते. याचं गाण्याच्या शुटींग दरम्यान गेरार्ड पिक आणि शकीराची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघेही रिलेशनमध्ये आले होते. दरम्यान तब्ब्बल 12 वर्ष  रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं आहे.  

नात्यातील दुराव्याबाबत धक्कादायक खुलासा 
एका पत्रकाराने या दोघांच्या रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. एमिलियो पेरेझ डी रोजास असे या पत्रकाराचे नाव असून त्याच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी शकीराने तिचा पार्टनर गेरार्ड पिकला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. दोघे आाता एकमेंकांपासून वेगळे झाले होते. याचसोबत शकीराने जेरार्ड पिकवर फसवणूक केल्याचा आरोप केला असल्याचे पत्रकार म्हणतोय.