IPL 2025 Panjab Kings : आयपीएल 2025 साठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी आयपीएल टीममध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून समोर येत होत्या. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाब किंग्स टीमची सह मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा हिने टीमच्या सह मालकांविरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे. प्रीतीने टीमचे सह मालक आणि प्रमोटर मोहित बर्मन यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून यात तिने मोहीतला आयपीएल फ्रेंचायझीमधील त्याच्या शेअरचा एक भाग कोणत्या वेगळ्या व्यक्तीला विकण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. आता प्रीतीने दाखल केलेल्या याचिकेवर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडेल.
क्रिकबझने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रीतीने मध्यस्थी आणि समेट अधिनियम 1996 चे कलाम 9 अन्वये कोर्टात अंतरिम उपाय आणि निर्देशची मागणी केली आहे. बर्मनजवळ केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सर्वाधिक भाग आहे. बर्मनकडे 48 टक्के शेअर्स असून तो सर्वात मोठा शेअर होल्डर आहे. तर प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्याकडे प्रत्येकी 23- 23 टक्के शेअर्स आहेत. तर उर्वरित शेअर्स हे चौथे मालक करण पॉल यांच्याकडे आहेत. बर्मन हा आयुर्वेद आणि FMCG कंपनी डाबरचा चेअरमन आहे. तो कॅरेबिन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी सेंट लुसिया किंग्सचे डिरेक्टर आणि सहमालक सुद्धा आहेत.
हेही वाचा : Vinesh Phogat : भारतात परतताच विनेश फोगटला अश्रू अनावर, साक्षी आणि बजरंगने दिला धीर Video
असं म्हंटल जातंय की, बर्मनला त्याचे 11. 5 टक्के शेअर्स कोणा तिसऱ्या व्यक्तीला द्यायचे आहेत. मात्र हे प्रीतीला मान्य नसून ती यांचा विरोध करतेय. सध्या बर्मन त्याच्या शेअर्स मधला हिस्सा कोणाला विकू इच्छितात याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर बर्मनने शेअर्स विकण्याच्या बातमीचे खंडन केले आहे. क्रिकबझने सांगितल्यानुसार बर्मनने म्हंटले की, 'माझा शेअर्स विकण्याचा कोणताही प्लॅन नाही'. बर्मनने या बातमीचे खंडन केले असेल तरी प्रीती आणि इतर सहमालकांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
TROUBLE IN PUNJAB KINGS!
Preity Zinta who holds a 23 per cent shareholding in the Punjab Kings has filed an appeal in the Chandigarh High Court as one owner of the group is trying to sell his 48 percent shares to some unnamed party. According to the rule, shares can be sold… pic.twitter.com/czwNEi47pY
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) August 16, 2024
पंजाब किंग्स या टीमचे पूर्वीचे नाव किंग्स 11 पंजाब असे होते मात्र ते नंतर बदलण्यात आले. पंजाब किंग्सची टीम आयपीएलच्या सुरुवातीपासून स्पर्धेत सहभागी आहे. मात्र 17 वर्षांच्या काळात त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सचे प्रदर्शन काही खास राहिले नाही. त्यांनी 2024 चा सीजन शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानी राहून संपवला.