ऑलिम्पिक मेडल घेऊन आलेल्या मनु भाकरने घेतला 3 महिन्यांचा ब्रेक, कोच चिंतीत!

Manu Bhaker Future Plan: ब्रेकदरम्यान आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करणार असल्याचं मनूने सांगितलंय.पण तिच्या आवडीच्या गोष्टींवर कोचनी चिंता व्यक्त केलीय.

Pravin Dabholkar | Updated: Aug 17, 2024, 01:39 PM IST
ऑलिम्पिक मेडल घेऊन आलेल्या मनु भाकरने घेतला 3 महिन्यांचा ब्रेक, कोच चिंतीत! title=
मनु भाकरने घेतला 3 महिन्यांचा ब्रेक, कोच चिंतीत!

Manu Bhaker Future Plan: पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला 2 कांस्य पदक मिळवून देणाऱ्या नेमबाज मनू भाकरचं देशभरात कौतुक होतंय. सलग प्रॅक्टीस करताना पिस्टल रिकॉइलममुळे तिच्या नेम धरणाऱ्या हातांवर जखमा झाल्या आहेत. यामुळे ऑलिम्पिकमधून परतल्यावर मनू भाकरने 3 महिन्याच्या ब्रेकवर जाणयाचा निर्णय घेतलाय. या ब्रेकदरम्यान आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करणार असल्याचं मनूने सांगितलंय.पण तिच्या आवडीच्या गोष्टींवर कोचनी चिंता व्यक्त केलीय.

मनू 3 महिन्याच्या ब्रेकवर असली तरी तिच्या रुटीनमध्ये फारसा बदल होणार नाही. सकाळी 6 वाजता उठून योगा करणे आणि इतर रुटीन तोच राहणार आहे. दरम्यान आपण घोडेस्वारी, स्केटींग, भरतनाट्यम आणि वॉयलिन शिकण्यासारख्या काही राहिलेल्या आवडी निवडी पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे मनूने सांगितले. 22 वर्षीय मनूने शुक्रवारी आपले कोच जसपाल राणा यांच्यासोबत स्वत:च्या करिअर आणि भविष्याबद्दल चर्चा केली.

ग्रॅज्युएटही न झालेल्या मनू भाकरची किती आहे संपत्ती? सर्वकाही जाणून घ्या

काही झाल्यास जबाबदार मनूच

सुट्टीमध्ये आपण काय करणार याची बकेट लिस्ट सांगताना मनू भाकरच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. घोडेस्वारी करण्याला मनूच्या कोचने विरोध केला. कोणतीही दुखापत न होता तुला परताव लागेल असं त्यांनी मनूला सांगितलं. हे ऐकून मनू हसू लागली. मनूने स्केटींग,घोडेस्वारी करु नये. काहीही झालं तरी त्याची जबाबदार ती असेल. घोड्यावर बसताना आपण पडू शकतो असा विचार कोणी करत नाही, असे त्यांनी सांगितले. 

 कोच जसपाल राणांकडून चिंता व्यक्त

मी ऑलिम्पिक संपण्याची वाट पाहत होती. मला घोडेस्वारी करायची आहे. मला स्काय डायव्हिंग आणि स्कूबा डायव्हिंगदेखील करायची आहे. मी खूप मोठा काळ यासाठी वाट पाहिलीय, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती. यावर मनूचे कोच जसपाल राणा यांनी चिंता व्यक्त केली. दुखापतग्रस्त असल्याने आम्ही तिला 3 महिन्याचा ब्रेक देतोय. गेल्या 8 महिन्यांपासूनची तिची जखम भरली नाहीय.  त्यामुळे तिला आरामाची गरज आहे. वर्ल्ड कप घोषणेच्या खूप आधी आम्ही हा निर्णय घेतला होता. या काळात ती नेमबाजी करणार नाही, असे त्यांनी सांगितले. या 3 महिन्याच्या ब्रेकमुळे मनू दिल्लीमध्ये होणाऱ्या आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.