Most Expensive Player of IPL 2025: काही काळापूर्वीच आयपीएल मेगा लिलाव झाला. या लिलावात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला त्याला लखनौ सुपर जाईंट्सने 27 करोड या किंमतीला विकत घेतले आहे. पण दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन का केलं नाही याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी खुलासा केला आहे. ऋषभने स्वतः लिलावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बदानी यांनी सांगितले. पण त्याने तो निर्णय का घेतला यावर बोलताना ते म्हणाले की त्याला 18 कोटी या रिटेन किंमत ठेवलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम मिळेल असे वाटले. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, या उत्कृष्ट फलंदाजाला न घेण्यामागे पैसे हे कारण नव्हते, तर बदानी यांनी आता नेमके उलट कारण दिले आहे.
हेमांग बदानी यांनी सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, "ऋषभ पंतला संघात कायम ठेवायचे होते. त्याला लिलावात सहभागी होऊन बाजाराची चाचणी घ्यायची असल्याचे त्याने सांगितले. जर तुम्हाला खेळाडू कायम ठेवायचा असेल, तर दोन्ही पक्षांना (संघ आणि खेळाडू) काही गोष्टींवर सहमती असावी लागते. व्यवस्थापनाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. अनेक फोन कॉल्स आणि मेसेजही केले."
बदानी म्हणाले, “ऋषभ पंतला लिलावात जाऊन आत्मपरीक्षण करायचे होते. राखून ठेवलेल्या खेळाडूसाठी 18 कोटी रुपयांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील असे त्याला वाटत होते. त्याला जे वाटले तेच झाले. मेगा लिलावात पंतला २७ कोटी रुपये मिळाले. ते त्यांच्यासाठी चांगले झाले. तो खूप चांगला खेळाडू आहे. आम्हाला त्याची नक्कीच आठवण येईल.” लखनौ सुपर जायंट्सने पंतला 27 कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्याला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवले.
हे ही वाचा: हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन
to for a gigantic #TATAIPLAuction | TATAIPL | @RishabhPant17 | @LucknowIPL |… pic.twitter.com/IE8DabNn4V
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
हे ही वाचा: Sachin vs Virat: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? सुनील गावस्करांचे उत्तर एकदा ऐकाच
ऋषभ पंतने पैशांमुळे दिल्लीचा संघ सोडल्याच्या गोष्टीचे खंडन केले आणि दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा पैशाशी काहीही संबंध नाही, असे सांगितले. पंतने X वर लिहिले, “माझे रिटेन्शन म्हणजे पैसे असे नव्हते. जे मी निश्चितपणे सांगू शकतो. ” दिल्लीचे सहमालक पार्थ जिंदाल यांनीही मेगा लिलावानंतर सांगितले होते की पंतने फ्रँचायझी सोडणे हे पैशांमुळे नाही तर यष्टीरक्षकाने दिलेला फीडबॅक नीट न घेतल्याने होता.