IND vs NZ 2nd T20: डीडी स्पोर्ट्सवर भारत-न्यूझीलंड T20 मॅच का दिसत नाहीए? जाणून घ्या

डीडी स्पोर्ट्सवर क्रिकेट फॅन्स वैतागले, दुसरी सामना न दाखवल्याने राग अनावर, तुम्हाला दिसतेय का मॅच? 

Updated: Nov 20, 2022, 07:06 PM IST
IND vs NZ 2nd T20: डीडी स्पोर्ट्सवर भारत-न्यूझीलंड T20 मॅच का दिसत नाहीए? जाणून घ्या title=

IND vs NZ 2nd T20: न्युझीलंड (New Zealand) विरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिय़ाने (Team India) 192 धावांचा डोंगर उभारला आहे.सूर्यकुमार यादवच्या (Surykumar yadav) 111 धावांच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या उभारली आहे. या धावांचा पाठलाग आता न्युझीलंड करत आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडिया चांगली खेळून देखील फॅन्स वैतागले आहे. फॅन्सच्या वैतागण्याचे कारण डीडी स्पोर्ट्स (DD Sports) ठरला आहे. फॅन्सच्या वैतागण्याचे नेमक काय कारण आहेत ते जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : सुर्यकुमार यादव ठरला 'विराट' विक्रमाधीश!कोहलीचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडला

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना सध्या माऊंट मौनगानुई येथे सुरू आहे. या सामन्यापुर्वी डीडी स्पोर्ट्सकडून (DD Sports) सांगण्यात आले होते या संपूर्ण स्पर्धेचे प्रसारण चॅनेलवर करण्यात येणार आहे. मात्र आज दुपारी ज्यावेळेस क्रिकेट फॅन्सने टीव्ही चालू केला, त्यावेळेस त्यांची मोठी निराशा झाली. 

हे ही वाचा : 'ही दुसरी व्हिडिओ गेम खेळी', सुर्याच्या शतकावर विराटचं भन्नाट ट्विट

मॅच न दाखवण्याचे कारण काय? 

आज आधीच रविवार आहेत, त्यात टीम इंडियाची (Team India) मॅच, त्यामुळे क्रिकेट फॅन्संनी निवांत मॅच पाहण्याचा मुड बनवला होता.मात्र डीडी स्पोर्टसवर (DD Sports) मॅचच दाखवली नसल्याने क्रिकेट फॅन्सची निराशा झाली होती. आज दुपारी सामना पाहण्यासाठी बहुतेक चाहत्यांनी टीव्ही चालू केल्यावर त्यांची घारे निराशा झाली. डीडी स्पोर्टस मॅच ऐवजी एक जुना हॉकी सामना प्रसारित होत आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट फॅन्सने सामना कुठे पाहावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

हे ही वाचा : 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे टीम इंडियाच्या खेळाडूची पत्नी,PHOTO पाहून थक्क व्हाल

क्रिकेट फॅन्सची प्रतिक्रिया काय? 

सोशल मीडियावर क्रिकेट फॅन्स प्रश्न विचारत आहेत की ते, डीडी स्पोर्ट्सवर (DD Sports) थेट सामना कसा पाहू शकतात. काही लोकांनी चुकीची माहिती दिल्याबद्दल दूरदर्शनलाही ट्रोल केले. वास्तविक, हा सामना खाजगी डिश ऑपरेटर म्हणजेच टाटा प्लेसह इतर प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जात नाही. डीडी फ्री डिशद्वारे थेट सामने पाहता येत आहेत. 

दरम्यान या घोळामुले अनेक फॅन्स टीम इंडियाच्या (Team India) या सामन्याला मुकले आहेत.