भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, T20 World Cup मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक पाहा

Ind vs Pak : भारतीय  क्रिकेट संघाचं नव्या वर्षातील वेळापत्रक जाहीर झालं आहे. नव्या वर्षात टीम इंडियासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते टी20 विश्वचषकाचं. जूनमध्ये वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 विश्वचषक स्पर्धा होणार असून भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे.

राजीव कासले | Updated: Jan 4, 2024, 02:08 PM IST
भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, T20 World Cup मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक पाहा title=

India v Pakistan in T20 World Cup 2024: क्रिकेटसाठी  2023 हे वर्ष महत्त्वाचं ठरलं. याच वर्षात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडली. आता नव्या वर्षात क्रिकेट चाहत्यांना टी20 विश्वचषकाची मेजवाणी मिळणार आहे. गेल्या बारा वर्षात टीम इंडिया एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. आता आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) जिंकण्याची चांगली संधी टीम इंडियाकडे (Team India) आहे. यावर्षी जून महिन्यात टी20 विश्वचषक स्पर्धा पार पडणार असून वेस्ट इंडिज आणि अमिरेकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं लवकरच वेळापत्रकही जाहीर केलं जाईल. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक कळलं आहे. 

आयसीसी टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेतला दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला (India vs Pakistan) खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 12 जूनला यजमान अमेरिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हे तीनही सामने न्यूयॉर्कमधले खेळवले जाणार आहेत. अखेरच्या क्षणी वेळापत्रकात बदल कहोण्याची शक्यता आहे. 

टी20 विश्वचषकात भारतीय संघाचं वेळापत्रक

5 जून - Vs आयरलँड, न्यूयॉर्क
9 जून - VS पाकिस्तान, न्यूयॉर्क
12 जून - VS अमेरिका, न्यूयॉर्क
15 जून - VS कॅनडा, फ्लोरिडा
20 जून - Vs सी-1 (न्यूजीलंड) बारबाडोस
22 जून - Vs श्रीलंका, अँटिग्वा
24 जून - Vs ऑस्ट्रेलिया, सेंट लूसिया

26 जून - पहिली सेमीफायनल, गयाना
28 जून - दूसरी सेमीफायनल, त्रिनिदाद
29 जून - फायनल, बारबाडोस

टी20 विश्वचषकाचा असा आहे फॉर्मेट
टी20 विश्लचषक स्पर्धा 4 जूनपासून 30 जूनपर्यंत वेस्टइंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांचा समावेश असणार आहे. चार ग्रुपमध्ये प्रत्येकी पाच संघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक ग्रुपमधले टॉपचे दोन संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. सुपर-8 मधले संघ दोन ग्रुपमध्ये विभागले जातील. दोन ग्रुपमधील टॉपचे दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. दोन सेमीफायनलमधील विजेता संघ फायनलमध्ये आमने सामने असतील. यावेळची टी20 विश्वचषक स्पर्धा गेल्या टी20 विश्वचषकाच्या तुलनेत वेगळी असेल. या स्पर्धेत क्लालिफाईंग राऊंड असणार नाहीत. गेल्या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. 

12 संघांचा थेट प्रवेश
यंदाच्या टी20 स्पर्धेत बारा संघांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. यात भारतासह, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड संघांचा समावेश आहे. तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका यजमान संघ असल्याने त्यांना थेट प्रवेश मिळाला आहे.

8 संघांनी केलं क्वालिफाय
तर आठ संघांनी क्वालिफाय राऊंडमधून प्रवेश केला आहे. यात आयर्लंड, स्कॉकलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनाडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा या संघांचा समावेश आहे.