सानिया-मार्टिनाने सलग २९ सामने जिंकत रचला नवा विक्रम

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस यांचा गेल्या वर्षीपासून सुरु असलेला विजयी झंझावात नव्या वर्षातही कायम आहे. सलग २९ सामने जिंकत या जोडीने टेनिस विश्वात महिला दुहेरीत नवा विक्रम रचलाय. 

Updated: Jan 14, 2016, 02:20 PM IST
सानिया-मार्टिनाने सलग २९ सामने जिंकत रचला नवा विक्रम title=

सिडनी : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस यांचा गेल्या वर्षीपासून सुरु असलेला विजयी झंझावात नव्या वर्षातही कायम आहे. सलग २९ सामने जिंकत या जोडीने टेनिस विश्वात महिला दुहेरीत नवा विक्रम रचलाय. 

सिडनी टेनिस स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये सानिया-मार्टिना जोडीने रोमानियाच्या रालूसा ओलारु आणि कझाकस्तानच्या यारस्लोव्हा शेडोवा याजोडीला ४-६, ६-३, १०-८ असं नमवत स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारलीय. 

गेल्या वर्षी जबरदस्त फॉर्मममध्ये असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने विम्बल्डन, अमेरिकन ओपनसह तब्बल नऊ जेतेपदे जिंकली होती. तसेच महिला दुहेरीत पहिल्या स्थानावर कायम राखण्यात यश मिळवले होते.