नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामीच्या भावाला पशुतस्करीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आलीये. उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्हयातील डिडौली कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केलीये.
गाईंच्या तस्करी प्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या रिजवान या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला वाचवण्यासाठी हसीब पोलिसांशी भिडला. या दरम्यान रिजवान संधीचा फायदा घेत तेथून पुन्हा पसार झाला. मात्र पोलिसांनी हसीबला ताब्यात घेतले.
याप्रकरणी तीन अज्ञातांसह पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण आणि वॉन्टेड आरोपीला पळून जाण्यात मदत करण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत.