विराट कोहलीवर अनुष्काची नजर, इंग्लड दौऱ्यात साथ-साथ

भारतीय धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाची चर्चा जोरदार आहे. आता तर अनुष्का इंग्लड दौऱ्यावर विराट सोबत आहे. विराटच्या या गर्लफ्रेण्डला बीसीसीआयने चक्क सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे म्हणे.

Updated: Jul 19, 2014, 02:12 PM IST
विराट कोहलीवर अनुष्काची नजर, इंग्लड दौऱ्यात साथ-साथ title=

नवी दिल्ली : भारतीय धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाची चर्चा जोरदार आहे. आता तर अनुष्का इंग्लड दौऱ्यावर विराट सोबत आहे. विराटच्या या गर्लफ्रेण्डला बीसीसीआयने चक्क सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे म्हणे.

विराट कोहली अनेक मुलींचा दिल का धडकन बनला आहे. अनुष्काशी सूत जुळल्यानंतर ट्विटरवरून थेट लग्नाचं प्रपोजल मांडणाऱ्या डॅनियल वेटची विराटने भेट घेतली होती, तीही लंडनमध्ये. डॅनियल वेट ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची ऑल राऊंडर खेळाडू आहे.

अनुष्का आणि विराट यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोरदार आहे. पण पहिल्यांदाच दोघे अधिकृतरित्या एकत्र जाणार असल्याची माहिती मिळत आहे. असे असले तरी दोघांच्या तोंडून चकार शब्द येत नाही. मात्र आता बीसीसीआयच्या परवानगीमुळे या दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याचे दिसतेय.

टीम इंडियाच्या दौऱ्यावर खेळाडूच्या कुटुंबियांना सोबत जाण्याची परवानगी मिळते. मात्र, प्रथमच एखाद्या खेळाडूला गर्लफ्रेण्डला सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळाली आहे आणि ही परवानगी विराटला मिळाली आहे.

याआधी न्यूझीलंड दौऱ्यावेळी अनुष्का विराटला भेटण्यासाठी ऑकलंडला गेली होती. तिथल्या रस्त्यावर हातात हात घालून फिरतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. 

विराटला अनुष्का एका शॅम्पू जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान भेटली. त्यानंतर विराट आणि अनुष्का यांच्यातील प्रेम फुलत गेलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.