राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामान

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 24, 2024, 07:28 AM IST
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामान title=
Maharashtra weather news north maharashtra will experiance temprature drop slight winter vibes

Maharashtra Weather Update: राज्यात गारवा वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळं थंडी वाढली आहे. त्यामुळं राज्याच्या किमान तापमानात 1 ते 2 अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळं काही जिल्ह्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

थंडीला पोषक हवामान असल्यामुळे महिनाअखेरपर्यंत राज्यभरात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 30 अंशाच्या खाली आला आहे. आज किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तसंच, राज्याच्या उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

विषुवृत्तीय हिंदी महासागरातील चक्राकाव वाऱ्यांच्या स्थितीमुळं या भागात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना दोन दिवसांत तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

आठवडाभर थंडीसाठी पोषक वातावरण

आठभर थंडीसाठी पोषक वातावरण असणार आहे. त्यामुळं थंडीत हळुहळु वाढ होऊ शकते. तसंच, आकाश निरभ्र असल्याचे थंडी जाणवत आहे. गुलाबी थंडी हळूहळू राज्यभरात दिसत आहे.

एकीकडे थंडी वाढत असताना प्रदुषणातही वाढ होताना दिसत आहे.  मुंबईपेक्षा सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसला आहे. राजधानी दिल्लीची हवा प्रदूषणामुळे विषारी झालेली असताना गुरुवारी वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) काही प्रमाणात सुधारणा झाली. असे असली तरी दिल्ली व आजूबाजूच्या परिसरातील एक्यूआय गंभीर श्रेणीत नोंदविण्यात आला. दुसरीकडे, किमान तापमानात झपाट्याने घट होत आहे.