पुणे : गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयिताचं रेखाचित्र पोलिसांनी तयार केलं. फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात हा स्फोट झाला होता. त्यात सहा जण जखमी झाले होते.
या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी 20 ते 25 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळी केले होते. त्यातील एका फुटेजमध्ये दोन संशयित मोटरसायकलवरून जात असल्याचं दिसत आहेत. त्यापैकी एकानं फरासखान्याच्या आवारात मोटरसायकल पार्क केली होती. या संशयितांपैकी एकाचे रेखाचित्र रेखाटण्यात आलंय.
रेखाचित्राच्या आधारावर आरोपींचा शोध घेण्यासाठी एटीएससह सर्व तपास यंत्रणांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हे रेखाचित्र अधिकृतपणे जरी करण्यात आलेले नसले तरी स्फोटाशीच संबंधित असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.