14 व्या मुंबई मॅरेथॉनवरआफ्रिकन धावपटूंचं वर्चस्व

14 व्या मुंबई मॅरेथॉनवर अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंनी आपले वर्चस्व गाजवले. 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनच्या आंतरराष्ट्रीय गटात टांझानियाचा अल्फन्सो सिंबूनं अव्वल क्रमांक पटकावला. तर दुस-या क्रमांकावर केनियाचा जोशुआ किप्कोटिल आणि तिस-या स्थानावर एलिऊड बार्नेग्टूनीनं बाजी मारली.

Updated: Jan 15, 2017, 08:09 PM IST
14 व्या मुंबई मॅरेथॉनवरआफ्रिकन धावपटूंचं वर्चस्व  title=

मुंबई : 14 व्या मुंबई मॅरेथॉनवर अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंनी आपले वर्चस्व गाजवले. 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनच्या आंतरराष्ट्रीय गटात टांझानियाचा अल्फन्सो सिंबूनं अव्वल क्रमांक पटकावला. तर दुस-या क्रमांकावर केनियाचा जोशुआ किप्कोटिल आणि तिस-या स्थानावर एलिऊड बार्नेग्टूनीनं बाजी मारली.

भारतीय गटात फुल मॅरेथॉनमध्ये खेतारामनं 2 चास 29 मिनिटं आणि 51 सेकंदांची वेळ नोंदवत पहिला तर महिला मॅरेथॉनमध्ये ज्योती गवते 2 तास 50 मिनिटे आणि 53 सेकंदांची वेळ नोंदवत पहिली आली. तर हाफ मॅरेथॉनमध्ये लक्ष्मणन जीनं अव्वल क्रमांक पटकावला. महिलांच्या हाफ मॅरेथॉनवर महाराष्ट्राचं दबदबा दिसून आला. मोनिका आथरे, मिनाक्षी पाटील आणि अनुराधा सिंहनं सरशी साधली.