मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून दोन गट

मुंबईत निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या तारखेवरून दोन गट पडले आहेत.

Updated: Jan 15, 2017, 07:47 PM IST
मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून दोन गट  title=

मुंबई : मुंबईत निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या तारखेवरून दोन गट पडले आहेत. नानासाहेब जावळे यांच्या गटाचे म्हणणे आहे की ३१ जानेवारीला मुंबईत चक्का जाम करावा आणि ६ मार्चला मोर्चा काढावा. तर नरेंद्र पाटील यांच्या म्हणण्यानुसार २३ मार्चाला मोर्चा काढावा. यामुळे मुंबईतल्या मराठा मोर्चाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

याआधी आचरसंहितेचं कारण देत मुंबईतला मराठा मोर्चा स्थगित करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या पण आयोजकांनी मात्र 31 तारखेला मराठा मोर्चा निघणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा तारखांवरून संभ्रम निर्माण झाला आहे.