मुंबई: काल झालेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या मतमोजणीनंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घेतल्या आजच्या सामनातल्या अग्रलेखातून स्पष्ट होतं.
आणखी वाचा - शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला
निवडणूकीच्या राजकारणात जे घडतं ते शेवटी प्रवाही असतं, झालं ते झालं... विकासासाठी सर्वांना सोबत घेऊनच काम करावं लागेल, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. त्यामुळं एकमेकांविरोधात विखारी प्रचारानंतर सेना आणि भाजपनं आपल्या तलवारी म्यान केल्याचं स्पष्ट होतंय.
पाहा काय लिहिलंय 'सामना'मध्ये -
कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात जोरदार तोफा धडाडल्या. एकमेकांच्या कासोट्यास हात घालण्याचा प्रयत्न झाला, पण शिवसेनेचा कासोटा घट्ट आहे आणि तो तसाच राहील. जनतेनं दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत.
निवडणुकीच्या राजकारणात जे घडते ते शेवटी प्रवाही असते. झाले ते झाले. आम्हाला कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचा ध्यास आहे. त्यासाठीच तेथील जनतेने शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. विकासासाठी सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागेल.
आणखी वाचा - ...तर कल्याणमध्ये सत्तेच्या जाव्या मनसेकडे ?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.