भररस्त्यात हस्तमैथून करणारा टविटरच्या मदतीने जेरबंद

भररस्त्यात हस्तमैथून करणाऱ्याला पकडण्यासाठी तरुणींनी टविटरची मदत घेतली आहे, आणि या मुलाचं कृत्य सर्वांसमोर आणलं आहे. 

Updated: Jul 20, 2016, 11:56 AM IST
भररस्त्यात हस्तमैथून करणारा टविटरच्या मदतीने जेरबंद title=

मुंबई : भररस्त्यात हस्तमैथून करणाऱ्याला पकडण्यासाठी तरुणींनी टविटरची मदत घेतली आहे, आणि या मुलाचं कृत्य सर्वांसमोर आणलं आहे. एका तरुणानं मोटरसायकल चालवता चालवता रिक्षात बसलेल्या तरुणीना खुणावत हस्तमैथुन केले. या घटनेचा फोटो घेत एका तरुणीने तात्काळ ही घटना ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना कळवली. 

अश्लिल चाळे करणारा ३ तासात जेरबंद

पोलीसांच्या सोशल मीडिया टीमने याची तात्काळ दखल घेतली, आणि भररस्त्यात अश्लिल चाळे करणाऱ्याला ३ तासात जेरबंद केले.  ट्विटरवर दाखलं झालेल्या मुबंई पोलिसांनी त्या तरुणींच्या एका ट्विटच्या आधारे ही कामगिरी पार पाडली. मुंबईत काही दिवसापूर्वी एक घृणास्पद गोष्ट घडल्याचं आता समोर आलंय.

कुठे घडली ही घटना...

मोटरसायकलवरील रोडरोमीओने तरूणींना पाहून चक्क हस्तमैथून करण्यास सुरवात केली. खार पश्चिममध्ये दोन महाविद्यालयीन तरुणींना पाहून त्याने हे कृत्य केले. या मुली ज्या रिक्षात बसल्या होत्या ती रिक्षा १६ नंबर रोडवर सिग्नल लागल्याने रिक्षा थांबली. यावेळी मोटरसायकलवरील एक तरूण त्यांच्या बाजूला आला आणि त्यांच्याकडे पाहून त्याने अश्लिल चाळे करण्यास सुरवात केली. 

सोशल मीडियाचा असाही फायदा

तरूणाचा हा प्रकार पाहून या मुली घाबरल्या, त्यांनी प्रसंगावधान राखत त्या व्यक्तिचा फोटो काढला, एवढंच नाही मोटारसायकलचा क्रमांकही घेतला. यानतर तो फोटो आपल्या मैत्रिणींना पाठवला आणि घडलेला प्रकार कथित केला. त्यापैकी एका मुलीने तो फोटो ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करुन पोस्ट केला. 

फोटोमधील व्यक्ति माझ्या मैत्रिणीकडे पाहून अश्लिल चाळे करत होता. काहीतरी अॅक्शन घ्या अशा प्रकराचे ट्विट केले. यानंतर लगेच मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने ही बाब टीपली आणि ती संबंधित पोलिसांना कळवण्यात आली.