कोकण रेल्वेचे बुकिंग हाऊसफुल्ल

 बातमी गणेशोत्सवासंदर्भातली. कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे यापुढे तिकिट काढायला जाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

Updated: Jun 28, 2014, 11:05 PM IST
कोकण रेल्वेचे बुकिंग हाऊसफुल्ल title=

मुंबई : बातमी गणेशोत्सवासंदर्भातली. कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे यापुढे तिकिट काढायला जाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

गणेशोत्सवात तुम्ही कोकण रेल्वेने कोकणात जायचा प्लॅन करत असाल, आणि त्यासाठी तिकीट रिझर्वेशन करणार असाल, तर तुमच्यासाठी बॅड न्यूज आहे. कारण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या रेल्वेचं रिझर्वेशन फुल्ल झालंय. त्यामुळे तुम्हाला काहीही माहिती नसेल आणि तुम्ही तासंतास रांगेत उभे राहून तिकिट खिडकीजवळ गेलात तर तुम्हाला तिकिट मिळणार नाही. तुमचा वेळ वाया जाणार आहे. गणेशोत्सवात तुम्ही कोकणात जायचा प्लॅन करत असाल तर तो तुम्हाला बदलावा लागेल.

रिझर्वेशन सुरु होताच अवघ्या काही मिनिटांतच कोकणात जाणा-यांच्या त्यावर अक्षरशः उड्या पडल्या आणि कोकणात जाणा-या सगळ्या गाड्या भरुन गेल्यायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.