जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील एस. बी. हायस्कूलच्या शिक्षकांनी असं कृत्य केलंय की ज्यामुळे शिक्षकी पेशाच्या अब्रूची लक्तरं वेशीला टांगली गेलीत. गावातील दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांकडून गुणपत्रिकेसाठी प्रत्येकी १०० रुपये उकळून या निर्लज्ज शिक्षकांनी शाळेच्या एका खोलीतच मटन आणि दारूच्या पार्टीचा बेत आखला. या देशी मास्तरांनी मद्यपान करून शाळेतच धिंगाणा घातला.
एकमेकांशी अंगलटपणा केल्यानंतर, शिपाई ज्ञानेश्वर न्हावी याची फिरकी घेतली. मग या तळीराम शिपायानं शिजलेल्या मटणाचे पातेलेच उलटे केलं. यामुळे चिडलेल्या शिक्षकांमध्ये एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत हाणामारी झाल्याचे कळते. गावात याची बोंबाबोंब झाल्यानंतर सरपंच तसंच काही गावक-यांनी शाळेकडे धाव घेतली. शाळेत गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून सरपंचांनी ज्या खोलीत ही पार्टी रंगलेली होती, तिला कुलूप ठोकून शिक्षणाधिका-यांकडे याबाबत तक्रार केलीय.
दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये गोळा करून शिक्षकांनी शाळेतच दारूचो ओली पार्टी केल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या खेडगाव नंदीचे या गावात घडलीय. दारू पिऊन हाणामारीवर उतररल्या नंतर गावकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर सरपंचानी पार्टी रंगलेल्या खोलीला कुलूप ठोकले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील याच एस.बी. हायस्कूल च्या शिक्षकांनी असं कृत्य केलंय कि ज्यांन शिक्षकी पेशाची अब्रूची लक्तरं वेशीला टांगली गेलीय, खेडेगावातील दहावी उत्तीर्ण झालेल्या निरागस मुलांकडून गुणपत्रकासाठी प्रत्येकी १०० रुपये उकळून या निर्लज्ज शिक्षकांनी शाळेच्या एका खोलीतच मटन आणि दारूच्या पार्टिचा बेत आखला. या देशी मास्तरांनी यासाठी इंग्लिश मद्यपान करून शाळेतच धिंगाणा घातला एकमेकांशी अंगलटपणा केल्यानंतर, शिपाई ज्ञानेश्वर न्हावी याची फिरकी घेतली, मग या तळीराम शिपायान शिजलेल्या मटणाचे पातेलेच उलटे केलं यामुळे चिडलेल्या शिक्षकांमध्ये एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत हाणामारी झाल्याचे कळते.
गावात याची बोंबाबोंब झाल्यानंतर सरपंच तसच काही गावकरयानी शाळेकडे धाव घेतली, शाळेत गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून सरपंचांनी ज्या खोलीत हि पार्टी रंगलेली होती, तिला कुलूप ठोकून शिक्षनाधीकारयांकडे याबाबत तक्रार दिलीय. दरम्यान या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल अस संस्थाचालकांकडून सांगण्यात आल.प्रश्न या शिक्षकांच्या मांसाहार करत दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा नाहीये, मात्र शिक्षनासारख पविता दान करणाऱ्या अशा ठिकाणी हे लज्जास्पद कृत्य या शिक्षकांनी केल्याने शिक्षकी पेशा असलेल्या सगळ्यांचीच मान खाली जाईल अस कृत्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.