गोंदिया : जिल्ह्यातील आमगावमध्ये तहसीलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली. आणि अवैधरीत्या साठवणूक केलेली वाळू मोठ्या प्रमाणावर जप्त केली.
आमगाव सालेकसा मार्गावर एकूण पाच ठिकाणी ही वाळू साठवणूक करून ठेवली होती. याची माहिती आमगावच्या तहसिलदार साहेबराव राठोड यांना मिळताच त्यांनी आपल्या ताफ्यासह या ठिकाणी धाड टाकली, ७० ब्रास वाळू जप्त केली.
तसंच जप्त केलेल्या वाळूची किंमत दीड लाखाचा आसपास आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणलेत.