'वाळू तस्करी थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

वाळू तस्करी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेच असल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

Updated: Oct 3, 2014, 12:55 PM IST
'वाळू तस्करी थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं' title=

ठाणे : वाळू तस्करी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेच असल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

वाळू तस्करीत सर्वपक्ष गुंतलेले असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेच आहे, असं सुप्रियांनी म्हटलंय.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीच्या तक्रारी आहेत, न्यायालयानेही वेळोवेळी बंदी आणण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशांचीही अवहेलना होत असतांना दिसतेय.

वाळू तस्करीमुळे जमीनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे, यामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास होतोय. ओव्हरलोड वाळूच्या डंपरमुळे रस्ते लवकर खराब होत आहेत, तसेच रस्त्यावरील अपघाताचे धोकेही वाढले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.