नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी विविधतेला स्वीकार करण्यात मानवतेचा विकास शक्य असल्याचं म्हटलं आहे.
विजयादशमी निमित्त आरएसएसच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करतांना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी तासभर केलेल्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्दे स्वयंम सेवकांसमोर ठेवले.
दरवर्षी विजयादशमीला संघ प्रमुख आपल्या स्वयंसेवकांना संबोधित करतात, संघाची नीती आणि विचारांविषयी ते चर्चा करतात. डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये आरएसएसची स्थापना केली होती.
मोदी सरकारविषयी बोलतांना भागवत म्हणाले, सरकारला सहा महिनेही झालेले नाहीत, अपेक्षा कायम ठेवून आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण परिस्थिती अशी आहे की, कुणाजवळ जादूंची कांडी नाही की, फिरवली की प्रगती होईल.
मोहन भागवत यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे
1) भागवत सुरूवातीला बोलतांना म्हणाले, कोणत्याही व्यक्तीला परकं माननं आणि त्याच्यावर विचार थोपवणं योग्य नसल्याचं भागवत यांनी म्हटलंय.
2) नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विषयी बोलतांना ते म्हणाले, यश मिळालंय, समाजात बदल करण्याचा चंग बांधलाय, आणि बदल होतांना दिसतोय.
3) नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा उल्लेख करतांना ते म्हणाले, समाजात बदल घडवण्याचा निर्धार केला आणि तो करून दाखवतोय.
4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्ये उत्साह दिसून आल्याचं भागवत यांनी म्हटलंय.
5) काश्मीरच्या पुरातील बचावकार्याविषयी भागवत म्हणाले, संकटाच्या वेळी सर्व समाज एक झाला, पूरग्रस्तांना मदत पोहोचली, भागवत यांनी केंद्र सरकारचं याबाबतीत कौतुक केलं.
6) भारत हा जगात एकमेव असा देश आहे, ज्या देशाने कोणताही स्वार्थ न ठेवता मानवतेला सुख शांतीचा रस्ता दाखवला.
7) पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारचा उल्लेख करतांना भागवत म्हणाले, परदेशी खुसखोरी होतेय, राज्य सरकारं मतांच्या लालसेनं त्यांच्यावर कोणतीही कारवाई करतांना दिसत नाहीत. घुसखोरीमुळे हिंदू समाजाचं जीवन संकटात आलं आहे.
8) पशुंचं मास विकून पैसा कमवला जाऊ शकत नाही, असं सांगत त्यांनी जनावरांचं मास निर्यात करण्यावर बंदी आणण्याची मागणी केली.
9) चीनच्या बाबतीत बोलतांना संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले, स्वदेशीचा वापर वाढवावा लागेल, आणि चीनी वस्तूंचा वापर बंद करावा.
10) नक्षलवादाविषयी बोलतांना भागवत म्हणाले, समाजाच्या एका भागाचं शोषण समाजच करतो, ज्या विरोधात समाजाला उभं रहावं लागेल.
11) सामाजिक भेदभाव पूर्णपणे हटवण्याचं काम सरकार करू शकत नाही, भागवत यांच्या मते, भेदभाव नष्ट करण्याचं काम समाजच करू शकतो. त्यांनी हे देखिल स्पष्ट केलं की सर्व कामं सरकार करू शकत नाही, यासाठी समाजाला पुढे यावं लागेल.
मंगळयान अभियानाशी संबंधित शास्त्रज्ञ आणि आशियाई स्पर्धेतील खेळाडूंचं त्यांनी कौतुक केलं, तसेच शुभेच्छा दिल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.