सलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग

सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिअॅलिटी शो बिग बॉस-९ सलमान खान होस्ट करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार कलर्स चॅनेलनं सलमान खानशी संपर्क केला असून त्याच्या डेट्स घेतल्याचं कळतंय.

Updated: Aug 20, 2015, 03:09 PM IST
सलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग title=

मुंबई: सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिअॅलिटी शो बिग बॉस-९ सलमान खान होस्ट करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार कलर्स चॅनेलनं सलमान खानशी संपर्क केला असून त्याच्या डेट्स घेतल्याचं कळतंय.

सलमान खाननं बिग बॉस-८चा पुढील भाग होस्ट केला नव्हता. फराह खाननं सलमानला रिप्लेस केलं होतं. कारण सलमान तेव्हा बजरंगी भाईजानच्या शूटिंगमध्ये बिझी होता. 

सलमाननं बिग बॉसचा सलग पाचवा सिझन होस्ट केलेला आहे. सलमाननं बिग बॉस-८ चं होस्टिंग अर्ध्यातून सोडल्यानंतर कार्यक्रमाच्या टीआरपीवर परिणाम झाला होता. लोकांना ते विशेष आवडलं नव्हतं. 

मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१५पासूनच बिग बॉस-९ चे स्पर्धेक निवडणं सुरू केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.