'बाहुबली'ला टक्कर देणार विजय-श्रीदेवीचा 'पुली'

दक्षिण भारतीय चित्रपट 'बाहुबली' सारखा आणखी एक चित्रपट 'पुली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुलीचा टिझर रिलीज झालाय. यात सुपरस्टार विजय आपला जलवा दाखवतांना दिसणार आहे.

Updated: Aug 20, 2015, 02:06 PM IST
'बाहुबली'ला टक्कर देणार विजय-श्रीदेवीचा 'पुली' title=

मुंबई: दक्षिण भारतीय चित्रपट 'बाहुबली' सारखा आणखी एक चित्रपट 'पुली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुलीचा टिझर रिलीज झालाय. यात सुपरस्टार विजय आपला जलवा दाखवतांना दिसणार आहे.

चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आणि फॅंटसीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. 'पुली'चा ट्रेलर पाहून या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्स, स्टंट्स आणि अॅक्शन सीन्स आपल्याला वेड लावेल.

पुलीचं वैशिष्ट्य म्हणजे यात बॉलिवूड स्टार श्रीदेवी आपल्याला अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसेल. यात श्रीदेवी एका महाराणीच्या भूमिकेत दिसतेय. 

ट्रेलर पाहून कळतं विजय यात डबलरोलमध्ये दिसेल. बाहुबली सारखेच स्पेशल इफेक्ट्स पुलीमध्ये दिसेल असं वाटतंय. श्रीदेवी, विजयसोबतच श्रुती हसन, हंसिका मोटवानी, नंदिता अहम, सुदीप, प्रभू यात मुख्य भूमिकेत दिसेल. चित्रपटाचं दिग्दर्शन चिंबू देवेननं केलाय. चित्रपट हॉलिवूड फिल्म 'द ग्लॅडिएटर'वर आधारित आहे. 
 
पाहा ट्रेलर -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.