महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ! पालकमंत्री पदाला स्थगिती दिली तरी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार

 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. पालकमंत्री पदाला स्थगिती दिली तरी अदिती तटकरे आणि गिरीश महाजन 26 जानेवारीला ध्वजारोहण करणार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 20, 2025, 06:34 PM IST
 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ! पालकमंत्री पदाला स्थगिती दिली तरी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार title=

Maharashtra Guardian Ministers :   महाराष्ट्रात मंत्रीपदाचा वाद शिगेला पोहचला आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द करण्यात आली.  19 जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. असे असले तरी प्रजासत्ताक दिनी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार असण्याची माहिती समोर आली आहे. 

महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. .गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले. 
पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. 

भरत गोगवले आणि दादा भुसे यांच्या नाराजीमुळे 19 जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार आहेत.  रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसवरुन आल्यानंतरच सुटण्याची शक्यता आहे. 

गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदावरून विजय वडेट्टीवारांनी टीका केलीय. गडचिरोलीला 2 नाही तर 3 पालकमंत्री देण्याचा टोला त्यांनी लगावला. 3 पालकमंत्री असल्यास 3 खात्याचे लाभ जिल्ह्याला मिळतील. तर एकमेकांवरही तिघांना लक्ष ठेवता येईल. असा टोलाही त्यांनी लगावला.