मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात कतरिना कैफ आणि तिचा मित्र अभिनेता रणबीर कपूर यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. रणबीर कपूरनं आपलं म्हणणं मीडियासमोर मांडून या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत.
रणबीर कपूरनं, सलमान खानला कोर्टानं दिलेल्या शिक्षेचा आदर करत... समाजानं सलमाननं केलेल्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घ्यायला हवी, असं म्हटलंय.
आपण कायद्याला आव्हान देणारे किंवा त्याच्याविरुद्ध काही बोलणारे कोण आहोत? मी व्यक्तीगतरित्या सलमान खानला ओळखतो. तो एक व्यक्ती म्हणून खूपच चांगला आहे, असं रणबीरनं म्हटलंय.
सलमाननं आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांची मदत केलीय. त्यानं समाजासाठी जबरदस्त काम केलंय त्यामुळे, त्याच्या शिक्षेवर टीप्पणी करण्यापेक्षा आपण त्याच्या कार्यातून प्रेरणा घ्यायला हवी... असा सल्लाही रणबीरनं दिलाय.
सोबतच, सलमान हा एक विश्व नायक आहे... सगळेच त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्या कुटुंबाला धीर मिळण्यासाठी आम्ही सगळेच प्रार्थना करत आहोत, असंही रणबीरनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.